भेंडखळ ग्रामपंचायततर्फे दिव्यांग व्यक्तींना पिठाच्या गिरणीचे वाटप.

उरण दि 28(विठ्ठल ममताबादे )दिनांक 28 /8 /2023 रोजी भेंडखळ गावातील आठ दिव्यांग व्यक्तींना सरपंच मंजीता मिलिंद पाटील, उपसरपंच दिपक ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य अजित ठाकूर ,अभिजीत ठाकूर, लिलेश्वर भगत, ग्रामपंचायत सदस्या संगीता मेघश्याम भगत , स्वाती महिंद्र घरत, सोनाली कौस्तुभ ठाकूर, शीतल जीवन ठाकूर, अक्षता अनिल ठाकूर , स्वाती संतोष पाटील, प्राची गणेश पाटील, ग्राम विकास अधिकारी किरण वसंत केणी यांच्या उपस्थितीत आठ दिव्यांग व्यक्तींना पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले. 
लाभार्थ्यांना भेंडखळ ग्रामपंचायत तर्फे पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन विविध योजना विषयी दिव्यांग्यांना माहिती देण्यात आली.शासनाच्या विविध योजना तळागाळातील जनते पर्यंत पोहोचविण्यासाठी भेंडखळ ग्रामपंचायत नेहमी प्रयत्नशील असल्याने सर्व ग्रामस्थांनी, प्रतिष्ठित मान्यवरांनी भेंडखळ ग्रामपंचायतच्या विविध कार्याचे व दिव्यांग बांधवाना पिठाच्या गिरणीचे वाटप केलेल्या कार्याचे कौतुक केले.


थोडे नवीन जरा जुने