रायगड जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये पक्ष प्रवेश.


रायगड जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये पक्ष प्रवेश.
उरण दि 13(विठ्ठल ममताबादे )शिवतीर्थ,दादर मुंबई येथे मनसेच्या नेत्या सौ. शर्मिला राजसाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते तसेच स्नेहलताई जाधव सरचिटणीस मनसे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर रायगड जिल्ह्यातील शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी रायगड जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर तसेच महिला जिल्हाध्यक्ष अदितीताई सोनार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. सर्व नवीन कार्यकर्त्यांचे शर्मिला वहिनींनी स्वागत केले.ह्या मोठया प्रमाणात पक्ष प्रवेश करण्यासाठी जिल्हा सचिव केसरी पाटील, अतुल चव्हाण,पनवेल तालुका उपाध्यक्ष दिपक पाटील, विभाग अध्यक्ष दशरथ मुंडे, विश्वनाथ पाटील तसेच पनवेल तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.पक्ष प्रवेशच्या वेळी जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर तसेच महिला जिल्हाध्यक्ष अदितीताई सोनार यांच्या समवेत पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील,महिला तालुका अध्यक्षा रेखा पवार, सचिव स्वरूपा सुर्वे, उरण तालुका उपाध्यक्षा कविता म्हात्रे, स्नेहल बागल, सोनल कदम, पनवेल तालुका उपाध्यक्ष दिपक पाटील, विभाग अध्यक्ष दशरथ मुंडे, विभाग अध्यक्ष विश्वनाथ पाटील तसेच पनवेल तालुक्यातील अनेक पदाधिकाऱी शिवतीर्थवर उपस्थित होते

.दिवसेंदिवस मनसेकडे जनतेचा कल वाढतच आहे. भविष्यात मनसे हाच एकमेव पक्ष राजकारणात उत्तम कामगिरी करणार असल्याने इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांचा तसेच जनतेचा ओढा या पक्षाकडे वाढला आहे.थोडे नवीन जरा जुने