आमदार प्रणितीताई शिंदे 14 ऑगस्ट रोजी पनवेल मधे.








आमदार प्रणितीताई शिंदे 14 ऑगस्ट रोजी पनवेल मधे.


उरण दि 13(विठ्ठल ममताबादे )आगामी 2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनीही आपली संपूर्ण टीम कामाला लावलेली आहे. मावळ लोकसभा मतदार संघाची जबाबदारी काँग्रेस पक्षाची वाघीण समजल्या जाणाऱ्या लढाऊ आमदार प्रणितीताई शिंदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वात रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे.



 मावळ लोकसभेत रायगड जिल्ह्यातील पनवेल,उरण व कर्जत -खालापूर विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. या तिन्ही विधानसभा मतदार संघाचा आढावा घेण्यासाठी आमदार प्रणितीताई शिंदे 14 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता काँग्रेस भवन पनवेल येथे येत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने पनवेल काँग्रेस मधे नवं चैतन्य निर्माण होईल. सदरील आढावा बैठकीस पनवेल, उरण, कर्जत- खालापूर मधील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी केले आहे.


थोडे नवीन जरा जुने