ग्रामपंचायत पागोटे तर्फे दिव्यांगांना संसारोपयोगी वस्तू वाटप.ग्रामपंचायत पागोटे तर्फे दिव्यांगांना संसारोपयोगी वस्तू वाटप.


 उरण दि 13(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील पागोटे ग्रामपंचायत तर्फे सण 2023 -24 या आर्थिक वर्षा मध्ये 5% दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत पागोटे गावातील सर्व दिव्यांग व्यक्तींना 'शासन दिव्यांगाच्या दारी' या योजने अंतर्गत उत्तम असे संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी पागोटे ग्रामपंचायतचे सरपंच कुणाल पाटील, उपसरपंच सुजित तांडेल, ग्रामपंचायत सदस्य-मयूर पाटील,सतिश पाटील, अधिराज पाटील, सदस्या- प्राजक्ता पाटील, करीष्मा पाटील, सुनीता पाटील, सोनाली भोईर, समृद्धी तांडेल,ग्रामसेविका अनिता म्हात्रे आदी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते.एकूण 14 अपंग व्यक्तींना उत्तम असे संसारोपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.विविध शासकीय योजना, सेवा, सुविधा तळागाळात सर्वसामान्य व्यक्ती पर्यत पोहोचविण्यात येत असून सरपंच कुणाल पाटील, उपसरपंच व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य शासनाच्या विविध योजना, सेवा सुविधा तळागाळात पोहोचविण्यासाठी विशेष मेहनत घेत आहेत.


थोडे नवीन जरा जुने