उरण दि 13(विठ्ठल ममताबादे )
आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे मेरी माटी मेरा देश अभियाना अंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट रोजी उरण तालुक्यातील भेंडखळ ग्रामपंचायत कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकविण्यात आले.ध्वजारोहन ग्रामपंचायतचे उपसरपंच दीपक ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले
. सदर कार्यक्रमास ग्रामपंचायतच्या सरपंच मंजिता पाटील, माजी उपसरपंच संगीता भगत, ग्रामपंचायत सदस्य अजित ठाकूर,लिलेश्वर भगत, अभिजीत ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य सोनाली ठाकूर, स्वाती पाटील, स्वाती घरत,शितल ठाकूर, प्राची पाटील,अक्षता ठाकूर,ग्राम विकास अधिकारी दिलीप तुरे,वरिष्ठ लिपिक दिपाली मते,निशा वशीकरण,प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर, विकास म्हात्रे, भगत मॅडम, विजया भगत,अंगणवाडी सेविका शारदा मॅडम, कल्पना ठाकूर, अंगणवाडी सेविकांचा पूर्ण स्टाफ, जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी हजर होते.एकंदरीत शासनाच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे भेंडखळ ग्रामपंचायत मध्ये आजादीका महोत्सव अंतर्गत ध्वजारोहण मोठया उत्साहात संपन्न झाले.
Tags
उरण