द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय वर्षा मॅरेथॉन व राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय वर्षा मॅरेथॉन व राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न.उरण दि 15(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील कला क्रीडा सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील गुणी कलाकार व खेळाडू यांच्या कलागुणांना वाव मिळावा,त्यांनी आपल्या कलेने प्रतिभेने तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे या हेतूने पक्ष विरहीत अशी द्रोणागिरी स्पोर्टस असोसिएशनची स्थापना करण्यात आली. या द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हास्तरीय शालेय तसेच खुल्या गटातील 23 वी द्रोणागिरी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा व राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते गेली 22 वर्षे या क्रिडा महोत्सवाचे आयोजन द्रोणागिरी स्पोर्टस असोशिएशन करत आहे.दि 11 ऑगस्ट 2023 ते 13 ऑगस्ट 2023 दरम्यान उरण शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान येथे राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा संपन्न झाली. तर दि 13 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8 वाजता बोकडविरा चारफाटा सेझ मैदान, पेट्रोल पंपा जवळ उरण येथे जिल्हास्तरीय वर्षा मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. फुटबॉल स्पर्धा व मॅरेथॉन स्पर्धा या दोन्ही स्पर्धांना खेळांडूचा, जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला.जिल्हास्तरीय मॅरेथॉन मध्ये जवळजवळ 4500 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत 16 संघानी सहभाग घेतला. स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्यानंतर 13 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान उरण शहर येथे विजेत्या खेळाडूंचा शाल,सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत 10 किलोमीटर मुली मध्ये प्रथम -मयुरी चव्हाण,द्वितीय क्रमांक-मोना पटवा,तृतीय क्रमांक-कोमल भिसो यांनी पटकाविला.

मुलामध्ये प्रथम क्रमांक -अभिनंदन सूर्यवंशी, द्वितीय -राज भगत, तृतीय- भानू यादव यांनी पटकाविले. मॅरेथॉन स्पर्धा मध्ये विविध वयोगटातील विद्यार्थी आणि धावपटूनी तसेच उरण अभिमान दौड मध्ये जेष्ठ नागरिकांनी आणि मान्यवरांनी सहभाग घेतला. तर राज्य स्तरीय फुटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविलेल्या के. एफ. ए संघ खोपोली या संघास बक्षीस रोख रक्कम रुपये 30,000 व भव्यदिव्य चषक देण्यात आले.तसेच द्वितीय क्रमांक- यंग लेबर मुंबई संघाने पटकविला. या द्वितीय संघास रोख रक्कम रुपये 15000 व भव्य दिव्य चषक देण्यात आले.आणि त्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरविण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष महादेव घरत,महिला विभाग प्रमुख वैशाली घरत,उपाध्यक्ष मनोज पडते,खजिनदार शिवेंद्र म्हात्रे, सचिव दिलीप तांडेल, क्रीडा प्रमुख भरत म्हात्रे, विजय पाटील, सचिन पाटील, प्रवीण तोगरे, इरफान खान, किरण घरत, प्रविण घरत, नयन पाटील, जयेश पाटील, रविंद्र पाटील,सुनीत घरत आदी मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी द्रोणागिरी स्पोर्टस असोशिएशनच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतलीथोडे नवीन जरा जुने