पिल्लई कॉलेजला मिळाले ‘कवच २०२३’ नॅशनल हॅकेथॉन आयोजित करण्याचा मान








पिल्लई कॉलेजला मिळाले ‘कवच २०२३’ नॅशनल हॅकेथॉन आयोजित करण्याचा मान 
पनवेल दि.०४ (संजय कदम) : महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या नवीन पनवेल येथील पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने ‘कवच २०२३’ नॅशनल हॅकेथॉन स्पर्धा आयोजित करण्याचा मान मिळवून आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून पिल्लई कॉलेजने पश्चिम विभागाकरिता एकमेव प्रतिनिधी म्हणून संधी प्राप्त केली आहे. 



           तंत्रज्ञानाच्या वापरात वेगाने होणाऱ्या वाढीमुळे विदा संरक्षण आणि संगणक संबंधीत व्यवहाराची सुरक्षा याला फार मोठे महत्व आले आहे. या वेळी कवच २०२३ ची संकल्पना पंतप्रधानांच्या संदेशाच्याच अनुषंगाने जाणारी आहे. २१ व्या शतकातील सुरक्षेशी संबंधित जी काही आव्हाने आहेत त्याच्यावर मात करण्यासाठी नवनवीन ज्ञानाचा अविष्कार करण्यात येत आहे. जगभर कृत्रिम बुद्धिमान वेगवेगळी क्षेत्रे पादाक्रान्त करत असताना संबंधित उद्योग क्षेत्रातील मागण्या आणि महाशिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्यात भरपूर तफावत आहे. ही दरी कमी करण्याच्या उद्देशाने एआयसीटीई ने संचालक प्रो. टी. बी. सीताराम सहसंचालक डॉ. अभय ोरे यांच्या नेतृत्वाखाली आणि शिक्षण मंत्रालयातील इनोव्हेशन सेल ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलोपमेंट इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने कवच २०१३ नॅशनल थॉन जाहीर करण्यात आली आहे. 



कवच २०२३ यातून प्रती विद्यार्थी आणि नवउद्यमी करीता एक चांगली संधी आहे. कवच- २०२० स्पर्धेच्या सुरुवातीच्या फेन्या पूर्ण झाल्या असून अंतिम फेरी ८९ ऑगस्ट २०२३ रोजी देशभरात पाच विभागीय केंद्रावर घेण्यात येणार आहे. ती केंद्रे पुढील प्रमाणे बेंगळूर, भोपाल भुवनेश्वर ग्रेटर नोयडा आणि नवी मुंबई मध्ये नवीन पनवेल. ३६ तासांची अंतिम फेरी पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नवीन पनवेल येथे पार पडेल सर्व मिळून २३ गट आहेत, ज्यात १३८ स्पर्धक आहेत आणि त्यांच्या बरोबर त्यांचे मार्गदर्शकही आहेत. स्पर्धेच्या नियमानुसार प्रत्येक गटात एकतरी मुलगी असली पाहिजे. कवच- २०२३ च्या निमिताने मुलींनाही संगणक व्यवहार सुरक्षेच्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल. स्पर्धेतील गटांना एकंदर दिलेल्या २० पर्यायापिकी एकावर काम करायचे असेल त्यातील काही पुढील प्रमाणे नव्या युगातील स्त्री सुरक्षा बनावट शोधणारी आधुनिक यंत्रणा गुप्त चतनाचा माग काढणे इ. हे सगळे पर्याय आपल्या समाजाच्या संगणक सुरक्षेशी निगडित आहेत. त्यामुळे "कवच हे नाव सार्थ आहे असे म्हणता येईल असे कवच अशी सुरक्षा यंत्रणा संगणक व्यवहारातील विदा पर्य आणि इतर गुन्ह्यापासून आपलं संरक्षण करेल


. स्पर्धेची वेळ अगदी नजीक येऊन ठेपली आहे. स्पर्धक सज्ज आहेत संगणक व्यवहार क्षेत्रातील सुरक्षेवर नवीन उपायांचे आपले योगदान देण्यासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ संदीप जोशी म्हणतात त्याप्रमाणे कॉलेजमधील सर्वजण कवच २०१३ या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यास सिद्ध आहेत ज्या योगे हि स्पर्धा सर्व स्पर्धकांच्या परीक्षकांच्या आणि मान्यवरांच्या लक्षात राहील. शिक्षण मंत्रालयातील इनोव्हेशन सेल चे विभागीय सल्लागार सौरभ निर्मळे यांची पिल्लई इंजिनिअरिंग कॉलेज येथील २०२३ केंद्राचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सर्व केंद्रांच्या एकत्रित समारोप समारंभाच्या वेळी माननीय मंत्रिगण आहेत ज्यामध्ये गृहमंत्री अमित शहा आणि शिक्षण व कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची उपस्थिती समारंभाची शोभा वाढवेल. विजेत्या संघाबरोबर त्यांचा वार्तालापही होईल.


थोडे नवीन जरा जुने