अज्ञात वाहनाची स्कुटीला धडक स्कुटीचालक जखमी
अज्ञात वाहनाची
स्कुटीला धडक; स्कुटीचालक जखमी
पनवेल दि.०४ (संजय कदम) : अज्ञात वाहनाने स्कुटीला दिलेल्या धडकेमध्ये स्कुटीनचालक गंभीर जखमी झाल्याची घटना मुंबई पुणे जुना महामार्गावर पनवेल परिसरात घडली आहे. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्कुटीचालक टॉमी जोसेफ नेलीकुनेल हे त्यांचे टिव्हीएस ज्युपीटर स्कुटी (क्र. एमएच ४६ टी ०९४२) ही वाशी येथून कोन पनवेल असे चालवीत घेवून येत असताना मुंबई-पुणे जुना महामार्गवर इंडीयन ऑईल पेट्रोलपंपा समोरील रोडवर आले असता पाठीमागुन कोणत्यातरी अज्ञात वाहनाने रस्त्याचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे व भरधाव वाहन चालवून त्यांचे स्कूटीस ठोकर मारली. या ठोकरमध्ये टॉमी नेलीकुनेल यांना गंभीर दुखापत झाले आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेट्टे करीत आहेत.


थोडे नवीन जरा जुने