उरण दि 30(विठ्ठल ममताबादे )
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे प्राथमिक शिक्षण हे रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवर झाले, त्यामुळे या शाळा आता टिकाव्यात या उद्देशाने त्यांनी उरण विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्याचा संकल्प सोडलेला आहे
आणि त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी उरण तालुक्यातील जासई गावातील प्राथमिक शाळेवर माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या वतीने वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते बाबुराव मढवी, शिवसेना सोशल मीडियाचे प्रमुख कार्यकर्ते नितीन ठाकूर यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमास जासई शिवसेना शाखाप्रमुख गुरुनाथ घरत, निलेश म्हात्रे, मनोहर म्हात्रे, नरेश घरत, उमेश निकम, स्कूल कमिटी अध्यक्ष परवीन शेख, वंदना पाटील, परवीन नदाफ, आशा अस्वले, गणेश पाटील, सुहास म्हात्रे, अमित म्हात्रे, गणेश कातकरी, शाळेचे मुख्याध्यापक सदानंद पाटील , सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश पाटील तर आभार दिपक पाटील यांनी मानले.
Tags
उरण