प्रश्न जिथे मराठी माणसाचा, उत्तर फक्त मनसेचा..!प्रश्न जिथे मराठी माणसाचा, उत्तर फक्त मनसेचा..!
उरण येथील एब्रो ग्रुप कंपनीच्या स्थानिक मराठी द्वेष्याला मनसेच्या एका चापटीने धुवून काढले.


उरण दि 6(विठ्ठल ममताबादे )उरण येथील एब्रो ग्रुप कंपनी मध्ये स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना कोणतेही अनुभव नसताना सहा महिन्यात उच्य पदावर बढती देतात ही बाब मनसेचे उरण उपतालुका अध्यक्ष मंगेश मामा वाजेकर यांच्या निदर्शनास आल्यावर मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर यांना सांगितले तात्काळ त्या व्यवस्थापनाच्या कार्यालयात संदेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे पदाधिकारी जाऊन कंपनी व्यवस्थापक कॅप्टन राकेश प्रसाद यांना जाब विचाला, परप्रांतीय नवीन भरती करायची त्यांना ट्रेनिंग स्थानिकांनी द्यायची आणि सहा महिन्यातच त्यांची पोस्टिंग ट्रेनिंग देणाऱ्या स्थानिकांच्या वरच्या पोस्ट वर करायची त्यांना 40 ते 50 हजार पगार आणि स्थानिकांनी फक्त 20 हजारावरच काम करायचे हा कुठला न्याय?

 परप्रांतीय भरती बंद करायला आणि जे परप्रांतीय भरले होते त्यांना लागलीच हेड ऑफिस ला पाठवून द्यायला लावले, होणारी भरती आणि बढती ह्या पुढे फक्त स्थानिकांचीच होईल. असे संदेश ठाकूर आणि मंगेश वाजेकर यांनी ठणकावले.

जे परप्रांतीय भरलेले त्यांना शिकवून ठेवलेल की स्थानिक गावाची नाव घ्या आपलं मुळ राज्याचे नाव सांगू नका, मनसेचे तालुका सचिव तथा वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष अल्पेश कडू यांनी त्यांना कुठून आले विचारले असता कामोठ्या वरून आलो सांगत होते मुळ गाव सांगत नव्हते एकच चापटी दिल्या बरोबर सर्वांनी आपले राज्य पटापट सांगितले कोण दिल्ली चा, कोण बिहारचा तर कोण तामिळनाडूचा...
ह्यावेळी जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर यांच्या समवेत उरण उपतालुका अध्यक्ष मंगेशमामा वाजेकर, तालुका सचिव अल्पेश कडू, द्रोणागिरी शहर अध्यक्ष रितेश पाटील, विभाग अध्यक्ष संदिप ठाकूर, शाखा अध्यक्ष विलास नवाले व इतर मनसे कार्यकर्ते हजर होते.
उरण मधील सर्व कंपनी व्यवस्थापनाला हा इशारा आहे की आपल्या व्यवस्थापनात फक्त स्थानिक व प्रकल्पग्रस्थ बेरोजगारांचीच भरती होईल अन्यथा मनसे स्टाईलने भरती केली जाईल.


थोडे नवीन जरा जुने