पनवेल दि.३१ (संजय कदम) : पनवेल तालुका पोलिसांनी वावंजे गावात छापा टाकून गुटखा विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करत हजारो रुपये किमतीचा गुटख्याचा साठा हस्तगत केला आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अमलीपदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे आदेश सर्व पोलीस स्थानकांना दिले आहेत. त्यानुसार पनवेल तालुका पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश शेळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोलीस हवालदार महेश धुमाळ, सुनील कुदळे, विजय देवरे, पोलीस शिपाई आकाश भगत आदींचे पथकाला गुप्त बातमीदाराकडून वावंजे गावात बेकायदेशीरपणे गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या पथकाने वावंजे गावातील जुने फर्निचर मार्केट येथे छापा टाकून आरोपी अब्दुल हमीद जानमोहम्मद शेख (वय ३२,रा. वावंजे), महेंद्र महातो (वय ३५, रा.वावंजे) आणि जितेंद्रकुमार कामत (वय २०, रा.पेंधर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १६ हजार २४७ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे.
Tags
पनवेल