वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत पनवेल शहर वाहतूक शाखेने राबवली जनजागृती मोहीम







वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत पनवेल शहर वाहतूक शाखेने राबवली जनजागृती मोहीम
पनवेल दि.३१ (संजय कदम) : नवी मुंबई वाहतूक शाखेअंतर्गत पनवेल शहर वाहतूक शाखेने विशेष जनजागृती मोहीम राबवून मोटर सायकल चालकांना हेल्मेट परिधान करणे, मद्यपाशन करून वाहन न चालवणे , वाहन चालविताना मोबाईल वर न बोलणे ,वाहतुकीचे नियम पाळणे पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे गाडीचे कागदपत्र अद्ययावत ठेवणे. मोटार कार चालवताना सीट बेल्ट लावणे याबाबत मार्गदर्शन केले.



             वाहने चालवताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु अनेक वाहन चालक याकडे दुर्लक्ष करुन नियम धाब्यावर बसवतात त्याचबरोबर आपला जीव सुद्धा धोक्यात घालतात. या पार्श्वभूमीवर पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पनवेल शहर वाहतूक शाखेच्यावतीने नवीन पनवेल उड्डाणपुलाजवळ विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी वाहनचालकांना हेल्मेट परिधान करणे, मद्यपाशन करून वाहन न चालवणे , वाहन चालविताना मोबाईल वर न बोलणे ,वाहतुकीचे नियम पाळणे पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे गाडीचे कागदपत्र अद्ययावत ठेवणे, मोटार कार चालवताना सीट बेल्ट लावणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नागरिकांना वाहतुकीचे नियम न पाळल्याने काय परिणाम होऊ शकतात याबाबत माहिती देण्यात आली.



 याप्रमाणे नागरिकांचाही खूप चांगल्या प्रकारे सहभाग या प्रबोधनपर कार्यक्रमात दिसून आला आणि बऱ्याच नागरिकांनी हे नियम आपल्यासाठीच आहेत आपल्या भल्यासाठीच आहेत, असे समजून नियम पाळण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक महाडिक, पोलीस उपनिरीक्षक खांडेकर यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने