शनिवारी पनवेलमध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन कार्यक्रम; लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य

शनिवारी पनवेलमध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन कार्यक्रम; लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य 

पनवेल (प्रतिनिधी) कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त नाद्ब्रम्ह साधना मंडळ खारघर व पनवेल तालुका सांस्कृतिक सेलच्या विद्यमाने शनिवार दिनांक ०५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ०५ वाजता पनवेलमध्ये शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.          मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, भजनसम्राट रायगड भूषण ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी, सिडको युनियनचे सेक्रेटरी जे. टी. पाटील, सांस्कृतिक सेलचे जिल्हा संयोजक अभिषेक पटवर्धन, ह. भ. प. नंदकुमार कर्वे यांची उपस्थिती लाभणार आहे. 


         या कार्यक्रमात प्रख्यात गायक रायगड भूषण उमेश चौधरी यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना हार्मोनियमवर नंदकुमार कर्वे तर तबल्यावर महेश कानोले साथ देणार आहेत. तर 'सूर नवा ध्यास नवा' फेम गायिका रश्मी मोघे यांचे उपशास्त्रीय गायन होणार असून त्यांना हार्मोनियमवर सिद्धार्थ जोशी, तबल्यावर किशोर पांडे, पखवाजवर मधुकर धोंगडे, साईट रिदम विशाल वाघमारे आणि झांजवर जगदीश म्हात्रे यांची साथ असणार आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांच्या अभंगवाणीने होणार असून त्यांना वसंतशेठ पाटील, शंकर म्हात्रे, नारायणबुवा पाटील, कृष्णा पवार, मोतीराम कडू, जितेंद्र म्हात्रे, मछिंद्र पाटील व नाद्ब्रम्ह साधना मंडळ शिष्य परिवाराची साथ लाभणार आहे. या कार्यक्रमाचा संगीत प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक अक्षय चौधरी व वैभव चौधरी यांनी केले आहे. 
थोडे नवीन जरा जुने