केंद्र सरकारच्या विविध योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा- आमदार प्रशांत ठाकूर








केंद्र सरकारच्या विविध योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा- आमदार प्रशांत ठाकूर 

पनवेल (प्रतिनिधी) कार्यक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या केंद्र सरकारच्या विविध योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (दि. १० )कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे केले. 



        भारतीय जनता पार्टी उमरोली जिल्हा परिषद विभाग च्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांचा सत्कार, तसेच कर्तुत्ववान महिलांचा सन्मान, भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सन्मान हा कार्यक्रम तालुका सरचिटणीस राजेश भगत व त्यांच्या पत्नी सुप्रिया भगत यांनी आयोजित केला होता. रोहित मंगल कार्यालय डिकसळ या ठिकाणी झालेल्या समारंभात आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, चिंचवली ग्रामपंचायतचे सरपंच रोशन पाटील, माणगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच निकिता कराळे, वृद्ध कलाकार साहित्यिक पेन्शन योजना समितीवर नेमणूक झालेले काशिनाथ पार्टे यांचा सन्मान करण्यात आला.






 तसेच उमरोली जिल्हा परिषद गटातील सामाजिक, आर्थिक, बचत गटात काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉक्टर किणी यांनी महिला सक्षमीकरण या विषयावर त्यांचे मनोगत व्यक्त केले. जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंडे, कर्जत तालुका मंडलाचे अध्यक्ष मंगेश म्हसकर, सरचिटणीस संजय कराळे, कर्जत नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल,




 जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, कल्पना दास्ताने, सनी यादव, नगरसेवक बळवंत घुमरे, नितीन कांदळगावकर, रमेश कदम सूर्यकांत गुप्ता, अभिषेक तिवारी, संदेश कराळे, दर्शन कांबळी, जयदास जाधव, केशव तरे, दीपक जगताप, हेमंत पाटील सूर्यकांत गुप्ता, स्नेहा गोगटे, एडवोकेट प्रीती तिवारी, शर्वरी कांबळे, सर्वेश गोगटे उपस्थित होते. दहा उद्योजक महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले, बचत गटातील महिलांना साडी वाटप करण्यात आले. त्यावेळी दीपक बेहेरे, अविनाश कोळी यांनीही मनोगत व्यक्त केले राजेश भगत यांनी प्रास्ताविक तर नम्रता कांदळगावकर यांनी सूत्रसंचालन केले.



थोडे नवीन जरा जुने