राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर कार्यशाळेचे आयोजनराष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर कार्यशाळेचे आयोजन
पनवेल दि . ०२ ( वार्ताहर ) : मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व निरंतर शिक्षण विभाग अंतर्गत कोंकण ज्ञानपीठ उरण कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, सर्वांकष शिक्षण शास्त्र महाविद्यालय चेंबूर आणि बार्न्स कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 रोड मॅप फॉर टीचर्स डेव्हलपमेंट या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.                सदर कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. चंद्रशेखर चक्रदेव सर्वांकर शिक्षण शास्त्र महाविद्यालय चेंबूर आणि प्राचार्य के.के.भोईर बार्न्स कॉलेज पनवेल, डॉ. शिवदास कांबळे सिइओ बार्न्स कॉलेज पनवेल, डॉ. बळीराम एन. गायकवाड कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय उरण यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाले. उद्घाटन प्रसंगी डॉ.चंद्रशेखर चक्रदेव, डॉ. बळीराम गायकवाड सर यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवरती प्रकाश टाकला. सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. बार्न्स कॉलेज सीईओ. डॉ. शिवदास कांबळे उपस्थित होते. सदर कार्यशाळेसाठी रायगड जिल्हा समन्वयक म्हणून प्रो. डॉ. बी. एस. पाटील सी के टी महाविद्यालय पनवेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अतिशय चांगले आहे, सदर कार्यशाळेसाठी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ. चंद्रशेखर चंद्रराव उपस्थित होते. त्यांनी शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक आणि शासन यांच्या सर्वांच्या जबाबदाऱ्या आणि शिक्षणातील प्रगती, शिक्षणातील बदल याविषयी अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेचे अध्यक्षस्थान प्राचार्य प्रा. डॉ. बळीराम गायकवाड सर यांनी भूषवले. त्यांनी २०२० शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या हिताचे असून प्राध्यापकांना अद्यावत राहणे आवश्यक असल्याचे सांगितले.डॉ.शिवदास कांबळे व प्रा. के. डी. शारा व प्रा. व्हि. एस. इंदुलकर यांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. डॉ. पी. आर. कारुळकर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. हर्षदा लोखंडे यांनी केले. सदर कार्यशाळेसाठी आय. क्यू. ए.सी. समन्वयक डॉ. ए.आर. चव्हाण उपस्थित होते. मोठ्या संख्येने प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग नोंदवला.


थोडे नवीन जरा जुने