श्री जरी मरी आईआई नवरात्र उत्सव मंडळ भेंडखळ तर्फे श्री गणेशोत्सव 2023 आरास स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न.






उरण दि 26(विठ्ठल ममताबादे )श्री जरी मरी आईआई नवरात्र उत्सव मंडळ भेंडखळ तर्फे श्री गणेशोत्सव 2023 आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये उत्कृष्ट आरास आणि इको फ्रेंडली आरास सजावट करण्यात आली होती. या आरास स्पर्धेमध्ये आणि कुटुंबीयांच्या वतीने सहभाग घेण्यात आला होता.गणेशोत्सव आरास स्पर्धा २०२३ इकोफ्रेंडली आरास स्पर्धेत प्रथम क्रमांक : सिद्धार्थ महेश ठाकूर,द्वितीय क्रमांक : योहान रोशन जाधव,तृतीय क्रमांक : प्रफुल्ल प्रभाकर ठाकूर यांनी पटकविला. तर उत्तेजनार्थ मध्ये जीवन वसंत ठाकूर,साची कैलास भोईर,भावेश संजय ठाकूर यांना उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात आली.उत्कृष्ट आरास स्पर्धेत प्रथम क्रमांक : भुषण मधुकर भोईर,द्वितीय क्रमांक : प्रमोद शंकर भोईर,तृतीय क्रमांक : चंद्रविलास पंढरीनाथ ठाकूर,उत्तेजनार्थ -संजय द्वारकानाथ ठाकूर, आयुष प्रसाद भगत,मनीष सुरेश ठाकूर यांनी बक्षीस पटकाविले.बऱ्याच स्पर्धकांनी पर्यावरण पूरक अशी सजावट करून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.या विजेत्यांना गावातील तळ्यावर पारितोषिक वितरणसमारंभ करण्यात आला


. या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अतुलशेठ भगत, मनसेचे उरण तालुका अध्यक्ष राकेश भोईर, आरपीआयचे उरण तालुका उपाध्यक्ष शिवाजी ठाकूर, पालवी संस्थेचे अध्यक्ष परशुराम भोईर,फ्रेंड्स सामाजिक कलामंचाचे अध्यक्ष चंद्रविलास घरत, भेंडखळ ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संगीताताई भगत, ग्रामपंचायत सदस्य अभिजीत ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश ठाकूर , विजय भगत, सचिन ठाकूर, प्रमोद ठाकूर, अशोक ठाकूर, मनोहर ठाकूर, विकास ठाकूर,चंद्रकांत ठाकूर, वैभव भगत, वैभव ठाकूर हे उपस्थित होते. यावेळी गणेश भक्तांसाठी शीतपेयची व्यवस्था श्री जरी मरी नवरात्र उत्सव मंडळ भेंडखळ यांच्या वतीने करण्यात आली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष किरण घरत,भावेश ठाकूर,कौशिक भोईर, प्रथम घरत व अक्षय भोईर यांनी मेहनत घेतली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रविलास घरत व आभार प्रदर्शन प्राध्यापक प्रांजल भोईर यांनी केले.


श्री जरी मरी आईआई नवरात्र उत्सव मंडळ भेंडखळ तर्फे श्री गणेशोत्सव 2023 आरास स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न.
थोडे नवीन जरा जुने