मुस्कान चौधरी बेपत्ता.






उरण दि. 26 (विठ्ठल ममताबादे ) मुस्कान नवनीत चौधरी, वय 13 वर्षे (जन्म तारीख 23/07/2011) ही मुलगी सध्या रूम - 103, एल 6, मल्हार सोसायटी, जेएनपीटी टाउन शिप समोर उरण, जि -रायगड येथे वास्तव्य करत होती.तर मुस्कानचे मूळ गाव मसुदानपूर, ता बलीया, जि - बेगुसराय, राज्य बिहार हे आहे.मुस्कान चौधरी ही जेएनपीटी टाऊनशिप मधील आर के स्कुलमध्ये इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होती.मुस्कान हिचे आई सोबत किरकोळ वाद झाला. व त्या रागाच्या भरात ती घराबाहेर पडली.आई वडिलांनी तीचा शोध घेतला परंतू ती मिळाली नाही. शेवटी दि 19/9/2023 रोजी मुस्कान नवनीत चौधरी ही मुलगी हरविल्या बाबत तीच्या आईवडीलांनी उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.अज्ञात इसमा विरोधात कलम 363 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.मुस्कान चौधरी हिला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचा संशय पोलिसांना आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सूरज कांबळे करीत आहेत.



रंग सावळा, चेहरा गोल, काळे डोळे,लांब केस, अंगाने सडपातळ, उंची 4.5 फूट,अंगात जांभळ्या रंगाचा टॉप व काळ्या रंगाची प्लाझो पॅण्ट असे मुस्कानचे वर्णन आहे. अशा वर्णनाची मूलगी कोणाला दिसल्यास किंवा मुस्कान बाबत कोणतेही माहिती मिळाल्यास त्यांनी उरण पोलिस ठाणे फोन नंबर 022 27222366 येथे तसेच पोलिस उपनिरीक्षक सुरज कांबळे फोन नंबर - 7620242450 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.


थोडे नवीन जरा जुने