उरण दि 23(विठ्ठल ममताबादे )
बोरी पाटील आळी, ता. उरण येथील कु. हर्ष पवार यांनी शाडूच्या मातीपासून आपल्या हस्तकौशल्याने सुबक अशी गणेश मूर्ती साकारली आहे.हर्ष याला लहानपणापासूनच चित्रकला विषयाची आवड होती. त्यामुळे त्यांनी आपले पुढील शिक्षण कला विषयातच पूर्ण करायचे असा निश्चित केले आणि त्याप्रमाणे त्यांने मे. जे के कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाईन, वडाळा, मुंबई. मधून फाउंडेशन कोर्स पूर्ण करून महाराष्ट्रातील कला क्षेत्रातील अग्रगणना कॉलेज म्हणजे जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे प्रवेश मिळवला. आणि त्या ठिकाणी त्याचे पुढील शिक्षण होत आहे
कॉलेज मुंबई एथून संध्याकाळी घरी आल्यानंतर गणेशाची मूर्ती बनविण्याचा निश्चय केला आणि यावर्षी या शाडूच्या मातीने बनवलेल्या गणेश मूर्तीचेच आपण पूजन करायचे अशी चर्चा त्यांनी आपल्या कुटुंबीयांबरोबर केली होती. आणि या त्याच्या निर्णयाला कुटुंबियांनी उत्स्फूर्तपणे सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
घरातून मिळालेली उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे हर्षने सदर श्री गणेशाची मूर्ती कलाकृती अतिशय आनंदाने पूर्ण केली आणि त्याच मूर्तीचे अतिशय मनोभावे सर्व कुटुंबीयांनी पूजनही केले.व त्यानंतर विसर्जनही केले. अशा प्रकारे पर्यावरण पूरक श्री गणेशाची मूर्ती घडवत असताना हर्षने कोणत्याही प्रकारचा साचे न वापरता सदर मूर्ती ही स्वहस्ते निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे हर्षने यावर्षी श्री गणेशाची मूर्ती बनविण्याची कार्यशाळा घेतली या कार्यशाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आणि काही पालकांनी गणेश मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण घेतले त्यांनीही पुढील वर्षी आपण आपल्या घरातील गणेश मूर्ती स्वतः बनवून त्याची स्थापना करून त्याच मुर्तीचे पूजन करायचा संकल्प केला आहे
.गणेशोत्सव पर्यावरणाची हानी करणारा न ठरता याउलट तो पर्यावरणाला पूरक / पर्यावरणाचे रक्षण करणारा ठरणार आहे. त्यामुळे आपल्याला सर्वांना निश्चितच आनंद होणार आहे असा विचार करून सर्वांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून या कृतीचे स्वागत केले पाहिजे.आपल्याला सर्वांना हवाहवासा वाटणाऱ्या गणेशोत्सवामुळे कळत नकळत होणारे पर्यावरणातील प्रदूषण टाळण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे असे आवाहन हर्ष पवार यांनी केले आहे. या कामी सर्वांनी स्वतःहून पुढाकार घेणे आवश्यक आहे.या निमित्ताने सर्व श्री गणेशभक्तांनी शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मुर्तीना प्राधान्य दिले पाहिजे हा बोध घेणे आवश्यक आहे.असेही हर्ष पवार यांनी सांगितले
Tags
उरण