कै.लता ठाकूर यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित शैक्षणिक साहित्य वाटप




उरण दि. 23(विठ्ठल ममताबादे )जासई गावातील ज्येष्ठ समाजसेविका कै. लता अमृत ठाकूर यांच्या प्रथम स्मृती दिना निमित्त श्री छत्रपती शिवाजी व लोकनेते दि.बा. पाटील ज्यूनियर कॉलेज दहागाव विभाग जासई या विद्यालयात विद्यालयाचे सल्लागार समितीचे ज्येष्ठ सदस्य आणि उरण पनवेल लॉरी मालक सेवा संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ सरस्य अमृत ठाकूर यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना एकूण 3000 वह्यांचे वाटप केले. यावेळी अमृत ठाकूर यांनी कै.लता ठाकूर यांच्या स्मृतींना उजाळा देउन विदयार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन प्रगती करावी. उच्च शिक्षण घ्यावे. देशाला पुढे न्यावे असे आवाहन केले. 


विदयार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य अभावी शिक्षण थांबू नये म्हणून तसेच सामाजिक बांधिलकीतून वह्या वाटप करण्यात आल्याचे अमृत ठाकूर यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रम प्रसंगी भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील, प्राचार्य अरुण घाग, रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नुरा शेख, उपमुख्याध्यापिका एस एस पाटील, विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने