शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते आरती संग्रहाचे प्रकाशन.

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते आरती संग्रहाचे प्रकाशन.
पागोटे गावचे सरपंच कुणाल पाटील यांच्या कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था यांच्यातर्फे आरती संग्रहाची गणेश भक्तांना भेटउरण दि 16(विठ्ठल ममताबादे ) पागोटे गावचे सरपंच कुणाल पाटील यांच्या कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था यांच्यातर्फे व शिवसेना पागोटे शाखेच्या यांच्या माध्यमातून श्री गणेश उत्सवासाठी छापण्यात आलेल्या आरती संग्रहाचे प्रकाशन शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर आरतीची पुस्तके श्री गणेशोत्सवाच्या वेळी सर्व गणेशभक्तांना भेट देण्यात येणार आहेत.  


सदर वेळी उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, उपतालुका संघटक के एम घरत, कामगार नेते गणेश घरत, पागोटे सरपंच कुणाल पाटील, नवघर युवासेना उपविभाग अधिकारी कुमार मढवी,शाखाप्रमुख महेंद्र पाटील, उपशाखाप्रमुख महेश पाटील, सचिव प्रदीप पाटील, खजिनदार मनोहर तांडेल, ग्राम विकास मंडळाचे उपाध्यक्ष सुरेंद्र पाटील खजिनदार ऋषिकेश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य मयूर पाटील, माजी शाखाप्रमुख अनिल पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश पाटील, नितीन पाटील, दीपक पाटील, प्रथम तांडेल प्रफुल पवार, विनय पाटील, आकाश म्हात्रे, रोशन म्हात्रे, विक्रम म्हात्रे, हितेश पाटील, प्रणय पाटील, तर नवीन शेवा शाखाप्रमुख शैलेश भोईर, एल जी म्हात्रे, मनोज घरत, अनंत पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने