नवीन शेवा तंटामुक्ती कमिटीच्या अध्यक्षपदी के एम घरत यांची बिनविरोध निवड


नवीन शेवा तंटामुक्ती कमिटीच्या अध्यक्षपदी के एम घरत यांची बिनविरोध निवड
 निवड होताच के एम घरत यांनी घेतले माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचे आशीर्वाद
उरण दि 16(विठ्ठल ममताबादे )
गुरुवार दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी ग्रामपंचायत नवीन शेवा ग्रामस्थांची ग्राम सभा संपन्न झाली या ग्रामसभेमध्ये शिवसेनेचे उरण उपतालुका संघटक के एम घरत यांची नवीन शेवा तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवड होताच के एम घरत यांनी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ग्रामसभा सुरू झाल्यानंतर के एम घरत यांचे नाव तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष पदासाठी ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमळाकर पाटील यांनी सूचित केले. तर कामगार नेते गणेश घरत यांनी अनुमोदन दिले. दुसरा कुठलाही उमेदवार नसल्यामुळे सरपंच सोनल घरत व उपसरपंच कुंदन भोईर यांनी के एम घरत यांची तंटामुक्ती कमिटीच्या अध्यक्ष पदी निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. सदर वेळी ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष व उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील व सरपंच सोनल घरत यांनी मनोगते व्यक्त केली तर के. एम. घरत यांनी आपली निवड बिनविरोध केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.
सदर ग्रामसभेस सरपंच सोनल निलेश घरत,उपसरपंच कुंदन भोईर, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख व ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमळाकर पाटील, द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर, उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, शाखाप्रमुख शैलेश भोईर, कामगार नेते गणेश घरत, दिनेश घरत, ग्रामपंचायत सदस्य अशोक दर्णे, भुपेंद्र पाटील, सतिश सुतार, मयुरी घरत, वैशाली म्हात्रे, रेखा म्हात्रे, भावना भोईर, शाखा संघटिका वैशाली सुतार, सुरेखा भोईर, जागृती घरत, शुभांगी भोईर, रंजना घरत, ललिता म्हात्रे, एल्. जी. म्हात्रे , शेखर पडते, पोलिस पाटील मनोहर सुतार, मनोज घरत, पी.डी. घरत , निलेश गो. घरत, अनंत घरत, सुरेश पाटील, निलेश द. घरत , सिध्देश म्हात्रे, नारायण घरत, सुशांत घरत, कुंदन घरत,जतीन घरत, निहाल घरत, व ग्रामस्थ उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने