कळंबूसरे ग्रामपंचायतच्या हद्दीतील विकासकामात भ्रष्टाचार झाल्याने त्यांची चौकशी करण्याची ग्रामपंचायत सदस्यांची मागणी.




कळंबूसरे ग्रामपंचायतच्या हद्दीतील विकासकामात भ्रष्टाचार झाल्याने त्यांची चौकशी करण्याची ग्रामपंचायत सदस्यांची मागणी.




उरण दि १६(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील कळंबूसरे ग्रामपंचायत तर्फे विविध विकासकामे सुरु असून अनेक विकास कामे झाले नसताना त्या विकास कामांचे कोणतेही पुरावे नसताना परस्पर ग्रामनिधी हडप केल्याचा आरोप काळंबुसरेचे ग्रामपंचायतचे सदस्य नितीन पांडरंग केणी यांनी केला आहे. कामे केले नसतानाही निधी हडप केल्याने कळंबुसरे ग्रामपंचायत ग्रामनिधीच्या भ्रष्टाचारची व लहान मुलांची दफन भूमी साफसफाई भ्रष्टाचार प्रकरणी सखोल चौकशी करून संबधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी 



अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सविता मनोहर नाईक नितीन पांडुरंग केणी, अश्विनी तळीराम नाईक, स्वप्नाली महेश पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी रायगड,विशेष कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद, गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे केली आहे.




लहान मुलांची स्मशान भूमी साफ सफाई हे काम १० ते १५ हजाराचेच काम आहे.परंतु या कामाचे ४७,२५० रुपये लावून ग्रामसेवक व सरपंच यांनी संगनमत साधून ग्रामनिधी हडप केला. ह्या कामाचं मासिक सभेचा ठराव नाही काम चालू करण्या अगोदरचे फोटो नाहीत, काम चालू केल्यावरचे फोटो नाहीत, जे फोटो जोडले गेलेत ते खोटे आहेत असे स्वतः सरपंच एका पत्राद्यारे कबूल करतात. कचरा कुठे टाकला हा पुरावा नाही



. एकाच दिवसात सकाळी ९ ते १५ एकाच गाडीच्या १८ फेऱ्या होतात, दुसऱ्या दिवसात १७ फेऱ्या आणि तिसऱ्या दिवसात १० फेऱ्या हे सगळं बघून संशय निर्माण होतो.तसेच कळंबुसरे नावाचे बोर्ड सामाजिक कार्यकर्ते राजू मुंबईकर यांनी फुकट दिले, तरी त्या कामाचे ३,९६० रुपये लावले जातात. अशा प्रकारे काहीतरी दाखवून निधी लाटण्याचा काम चालू आहे.असा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.




थोडे नवीन जरा जुने