शेकापच्या पाठपुरावाला यश मनपा क्षेत्रात खड्डे बुजवण्यास सुरुवात!
शेकापच्या पाठपुरावाला यश
मनपा क्षेत्रात खड्डे बुजवण्यास सुरुवात!

 *10 दिवसात डांबराने खड्डे बुजवले नाहीत 27 सप्टेंबर पासून शेकाप कार्याध्यक्ष महादेव वाघमारे करणार उपोषण* 
गणेशोत्सवापूर्वी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खड्डे बुजवण्यात यावेत अशा आशयाचे पत्र शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मनपा आयुक्त गणेश देशमुख यांना देण्यात आले होते. याबाबत कार्यवाही न झाल्यास 18 सप्टेंबर पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा पक्षाचे महानगरपालिका क्षेत्र कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिला होता. 


त्यानुसार मनपा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. शहर अभियंता संजय जगताप यांनी वाघमारे यांना पत्र देऊन महापालिका हद्दीत खड्डे बुजवण्यास सुरुवात झाल्याचे सांगितले आहे. पाऊस आणि रस्त्याच्या पृष्ठभागाची स्थिती पाहता दहा दिवसांची मुदत देण्यात यावी अशी विनंती शहर अभियंत्यांनी केली आहे. त्यानुसार शुक्रवारी पाहणी सुद्धा करण्यात आली. नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, कळंबोली आणि खारघर येथील रस्ते खड्डे मुक्त करून देण्याबाबत ग्वाही देण्यात आली आहे. प्रशासनाची विनंती शेतकरी कामगार पक्षाने मान्य केले आहे. परंतु दहा दिवसांमध्ये जर खड्डे डांबराने बुजवण्यात आले नाहीत तर 27 सप्टेंबर पासून आमरण उपोषण केले जाईल असा इशारा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिला आहे.


थोडे नवीन जरा जुने