शिक्षक आघाडीची बैठक संपन्नपनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी प्रणित शिक्षक आघाडीची बैठक प्रदेश शिक्षक आघाडीचे संयोजक डॉ. प्रशम कोल्हे आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि. २३ सप्टेंबर) पनवेल भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडली. 
         यावेळी संघटनात्मक बांधणी आणि जबाबदारी या विषयावर प्रशम कोल्हे व अविनाश कोळी यांनी मार्गदर्शन केले.


यावेळी शिक्षक आघाडीच्यावतीने नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीस प्रदेश सह संयोजक विकास पाटील, प्रदेश सदस्य एन. एम. भामरे, कोकण संयोजक किशोर पाटील, सह संयोजक विनोद शेलकर, उत्तर रायगड शिक्षक आघाडीचे संयोजक के. सी. पाटील, दक्षिण रायगड संयोजक हिरामण कोकाटे, बबनराव उकिर्डे, एस. के. पाटील, पी. जी. ठाकूर, कामोठे संयोजक शेखर जगताप, राजेंद्र पिंगळे, बा. द. ठोंबरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 


थोडे नवीन जरा जुने