रायगड जिल्ह्यातील टाटा स्टील युनिट सीआयआय नॅशनल अवॉर्ड फॉर एनर्जी एक्सेलेन्सने सन्मानित

पनवेल(प्रतिनिधी) रायगड जिल्ह्यातील टाटा स्टीलच्या खोपोली युनिटला २४व्या सीआयआय नॅशनल अवॉर्ड फॉर एक्सेलेन्स इन एनर्जी मॅनेजमेंटमध्ये "एनर्जी इफिशियंट युनिट" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हैदराबाद इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सीआयआयने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. टाटा स्टील खोपोलीचे हेड इलेक्ट्रिकल हेमेंद्र तिवारी यांनी कंपनीच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. 


       टाटा स्टीलच्या खोपोली युनिटला "एनर्जी इफिशियंट युनिट" विभागात सन्मानित करण्यात आले ही बाब पर्यावरणपूरक प्रथा आणि ऊर्जा बचतीच्या नाविन्यपूर्ण उपाययोजना यांचे पालन करण्याप्रती कंपनीची वचनबद्धता दर्शवते. या पुरस्कारासाठीच्या निवड प्रक्रियेमध्ये ऊर्जा व्यवस्थापन उपक्रमांचे तसेच ऊर्जा बचतीच्या नाविन्यपूर्ण उत्पादनांचा व सेवांचा विकास करण्याच्या प्रक्रियांचे काटेकोरपणे मूल्यांकन करण्यात आले.


         टाटा स्टीलच्या खोपोली आणि होसूर प्लान्ट्सचे एक्झिक्युटिव्ह प्लान्ट हेड कपिल मोदी यांनी सांगितले, "टाटा स्टील खोपोली युनिटला सीआयआय नॅशनल अवॉर्ड फॉर एक्सेलेन्समध्ये ऊर्जा व्यवस्थापनामध्ये पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ही आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे. शाश्वतता आणि ऊर्जा सक्षमता यांच्या प्रती टाटा स्टीलची वचनबद्धता या पुरस्कारातून दिसून येते. 

   


       या पुरस्कारांचा प्राथमिक उद्देश ऊर्जा व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीचा सन्मान करणे आणि सर्वोत्तम प्रथा व आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती व ज्ञानाच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देऊन उद्योगक्षेत्रासाठी एक मापदंड उभा करणे हा आहे. सीआयआय एनर्जी अवॉर्ड हे एक असे व्यासपीठ आहे ज्याठिकाणी ऊर्जा सक्षमतेमध्ये लक्षणीय योगदान देणाऱ्या कंपन्या आपले अथक प्रयत्न तसेच अभूतपूर्व कामगिरी दाखवू शकतात.


थोडे नवीन जरा जुने