पनवेल (प्रतिनिधी) टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्स ही भारतातील आघाडीची जीवन विमा कंपनी असून, सर्वाधिक एमडीआरटी पात्र सल्लागार असलेली जगातील पाचव्या क्रमांकाची इन्श्युरन्स कंपनी ठरली आहे.
कंपनीने मिलियन डॉलर राउंड टेबल लीगमध्ये १९७८ पात्र सल्लागारांची नोंद केली आहे. एमडीआरटी पात्र सल्लागार हे या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट समजले जातात. जीवन विमा क्षेत्रात त्यांच्याकडे उत्तम ज्ञान आणि त्यात ते कुशल असतात. ग्राहकांना उत्तम आणि योग्य सल्ला देण्यासाठी त्यांच्याकडे उत्तम माहिती असते. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या गरजांनुसार विमा योजना मिळते
.आणखी एक अभिमानाची गोष्ट ही की एमडीआरटी पात्र महिला सल्लागारांच्या संख्येतही टाटा एआयए जागतिक पातळीवर नववी कंपनी तर देशात अव्वल कंपनी ठरली आहे. कंपनीने पहिल्यांदाच या वर्गात जगातिल पहिल्या दहा कंपन्यांमध्ये स्थान मिळवले आहे.
टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सचे चीफ एजन्सी ऑफिसर अमित दवे म्हणाले की, खूप सारे टाटा एआयए सल्लागारांची जागतिक पातळीवर नोंद झाली आणि त्यांना सन्मान मिळाले हे पाहाणे मी माझे भाग्य मानतो. टाटा एआयएच्या ग्राहकांंना सल्लागारांचा उत्तम सल्ला मिळावा आणि सर्व पातळीवर त्यांना चांगला अनुभव यावा यावर आमचा भर असतो. हे साध्य करण्यासाठी आम्ही आमच्या सल्लागारांना या उद्योग क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट ट्रेनिंग, विकासासाठी सहाय्य आणि करीअर घडवण्याची संधी देतो.
Tags
पनवेल