पनवेल(प्रतिनिधी) दैनिक वादळवाराचे संस्थापक दा.चां.कडू गुरुजी यांची नात आणि संपादक विजय कडू यांची सुकन्या कुमारी जिज्ञासा विजय कडू हिने एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन इंटर्नशिप पूर्ण केली. ही बाब अभिमानास्पद असून जिज्ञासा चे यश हे भावी डॉक्टरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत दैनिक किल्ले रायगडचे संपादक प्रमोद वालेकर यांनी आज येथे केले. पनवेलमधील पत्रकारांनी पत्रकाराच्या मुलीच्या यशाबाबत अभीष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते.
पत्रकारिता क्षेत्र हे इतर क्षेत्रांमध्ये निराळेच क्षेत्र आहे. आजच्या परिस्थितीत डॉक्टर होण्यासाठी पैसा हाच महत्वाचा भाग आहे, आणि पत्रकारिता करून आपल्या मुलांना डॉक्टर करणे ही तारेवरची कसरत आहे. गरीब कुटुंबात जन्मलेले विजय कडू यांनी आर्थिक कठीण दिवस पार करताना मुलांना उच्च शिक्षण देण्याचे काम केले. आणि त्यांच्या मुलांनीही त्यांच्या अपेक्षा प्रत्यक्षात उतरवून समाजात मानसन्मान मिळविला. जिज्ञासा हिला नुकतीच एमजीएम कॉलेज - संभाजी नगर येथे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, संस्थेचे चेअरमन डॉ.कमलकिशोर कदम, डॉ. सुधीर कदम, डीन डॉक्टर नरशेट्टी या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या भव्यदिव्य सोहळ्यात पदवी प्रदान करण्यात आली.
डॉक्टर जिज्ञासा कडू ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. १० वीच्या परीक्षेत तिने ९५ टक्के गुण प्राप्त केले होते. जिज्ञासा हिने कामोठे येथील एम.जी. एम कॉलेजमधून एमबीबीएस पदवी प्राप्त केली.
डॉक्टर जिज्ञासा हीचा पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याचा विचार असल्याचेही तिने या कार्यक्रमादरम्यान सांगितले. यावेळी तिने आपली पदवी ही आई वडील आणि आजोबा दा.चा.कडू गुरुजी यांना समर्पित करीत असल्याचेही सांगितले. विजय कडू तसे कडक शब्दाचे मात्र यावेळी मुलीचा झालेल्या सत्काराने विजय कडू व भारती कडू भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात हा भाव तरळत असताना आनंदाश्रू असल्याचे त्यांच्या देहबोलीतून अधोरेखित झाले होते.
जिज्ञासा हिच्या यशाबद्दल तिचे अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यासाठी जेष्ठ पत्रकार प्रमोद वालेकर, संजय कदम, निलेश सोनावणे, रत्नाकर पाटील, प्रकाश म्हात्रे, अनिल भोळे, अनिल कुरघोडे, हरेश साठे, प्रविण मोहोकर, राज भंडारी, साहिल रेळेकर, मयूर तांबडे, रविंद्र गायकवाड, चंद्रकांत शिर्के, अनिल राय, विशाल सावंत, असीम शेख, सुभाष वाघपंजे, शंकर वायदंडे आदी पत्रकारांसह ऍड. परेश गायकवाड आणि भैरवी कडू-गायकवाड आदी उपस्थित होते.
Tags
पनवेल