चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा:एन.सी.सी. कॅडेटसची दैदिप्यमान कामगिरी    जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयातील नॅशनल कॅडेटस् कौर (N.C.C.) विभागाचे सी.एस.एम. हृदय मोहन पवार यांचे दिल्ली येथे होणाऱ्या ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प (TSC) साठी निवड करण्यात आली आहे.

          सन २०२१-२२ आणि २०२२-२०२३ मध्ये महाविद्यालयातील N.C.C. कॅडेटसची रिपब्लिक डे कॅम्प(RDC), नवी दिल्ली, साठी निवड झाली होती. तसेच २०२३-२०२४ यावर्षीही महाविद्यालयातील एका N.C.C. कॅडेटसची ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प (TSC) साठी निवड झाली आहे.          महाराष्ट्र संघात मुंबई ‘ए’ ग्रुप चे वर्चस्व गाजविणारे सी.एस.एम. हृदय मोहन पवार यांनी फिल्ड सिग्नल आणि जजिंग डिस्टन्स या विषयातून थल सैनिक कॅम्पमध्ये पदार्पण केले आणि १६० गुणांपैकी १४९ गुण प्राप्त करून महाराष्ट्र डिरेक्टरेट मधून प्रथम क्रमांक मिळवून मुंबई ‘ए’ ग्रुप व महाविद्यालयाचे नाव गाजविले. हृदय मोहन पवार यांना त्यांच्या निवडीसाठी मेजर डॉ. उद्धव तुकाराम भंडारे आणि लेफ्टनंट प्रा. नीलिमा तिदार यांचे कुशल नेतृत्व व योग्य मार्गदर्शन लाभले.

सी.एस.एम. हृदय मोहन पवार यांच्या निवडी बद्दल संस्थेचे चेअरमन मा. खासदार लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर, अध्यक्ष मा. श्री. अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन मा. श्री. वाय. टी. देशमुख, आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर आणि सचिव मा. डॉ. एस. टी. गडदे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) एस. के. पाटील आणि नॅशनल कॅडेटस् कौर (N.C.C.) विभागाचे प्रमुख प्रो.(डॉ.) उद्धव भंडारे आणि लेफ्टनंट नीलिमा तिदार यांनी त्यांचे शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.


थोडे नवीन जरा जुने