मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते सोमवारी जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन आणि पनवेल मध्यवर्ती कार्यालयाचे लोकार्पण



पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीच्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या उत्तर रायगड जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन तसेच नुतनीकरण केलेल्या पनवेल मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन सोमवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.




            उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे कार्यालय पनवेल तालुक्यातील डेरवली येथे उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन सकाळी ९. ३० वाजता वाजता करण्यात येणार आहे. तर पनवेल शहरात रुपाली सिनेमाजवळ असलेल्या मध्यवर्ती कार्यालयाचे नुतनीकरण करण्यात आले असून त्याचे लोकार्पण सकाळी १०. ३० वाजता होणार आहे. या कार्यक्रमास पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे, कामोठे मंडल अध्यक्ष रविंद्र जोशी, कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उरण मंडल अध्यक्ष रवी भोईर, खालापूर मंडल अध्यक्ष रामदास ठोंबरे, कर्जत मंडल अध्यक्ष मंगेश म्हसकर, खोपोली मंडल अध्यक्ष रमेश रेटरेकर यांनी केले आहे. 





थोडे नवीन जरा जुने