माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची भेट.





नवीन शेवा गावातील विकास कामे, वाढीव गावठाण व प्रलंबित 33.64 हेक्टर जमीन प्रश्नांवर जेएनपीए मध्ये पाठपुरावा
 माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची भेट.



उरण दि 18(विठ्ठल ममताबादे )जे एन पी टी प्रकल्पामुळे पुनर्वसीत झालेल्या नवीन शेवा गावातील विकास कामे, वाढीव गावठाण, नोकऱ्या व प्रलंबित 33.64 हेक्टर जमीन प्रश्नांवर सोमवार दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी जेएनपीए प्रशासन भवन मध्ये जनरल मॅनेजर व सचिव श्रीमती मनीषा जाधव यांची माजी आमदार तथा रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली भेट घेण्यात आली व नवीन शेवा गावाच्या पुनर्वसनाचे जटील प्रश्न, वाढीव गावठाण, 33.64 हेक्टर जमीन व नागरी सुविधा बाबत तसेच नोकऱ्या असे विविध समस्या बाबत चर्चा करून पाठपुरावा करण्यात आला. तसेच या सर्व प्रश्नांवर जे एन पी ए चे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.


               सदर वेळी नवीन शेवा ग्रामपंचायत सरपंच सोनल घरत, ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष कमळाकर पाटील, तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष के एम घरत, कामगार नेते गणेश घरत, गणेश म्हात्रे, शाखाप्रमुख शैलेश भोईर, ग्रामपंचायत सदस्य भूपेंद्र पाटील व निलेश घरत उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने