पनवेल दि.१५(वार्ताहर): पनवेल येथील ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी आपल्या महिला आघाडीच्या वतीने वाढदिवस संपन्न केला. त्यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे महिला आघाडीचे सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर शिवसेना उप महानगर प्रमुख महेश सावंत,उद्योजक सतीश मोरे आणि पत्रकार व जागृती फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश सोनवणे उपस्थित होते.
संजय कदम हे एक निस्पृह आणि निर्भीड पत्रकार आहेत. तसेच सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून वाचा फोडण्यासाठी नेहमी ते तत्पर असतात . महेश साळुंखे यांचे ते जवळचे मित्र आहेत . त्यांच्या अनेक कार्य कार्यक्रमाचे रिपोर्टिंग ते वर्तमानपत्रांमध्ये करत असतात . पनवेल मधील सर्व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, नेते त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांसमवेत त्यांचे जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे संबंध आहेत. ते एक अजात शत्रू आहेत. महेश साळुंखे यांनी त्यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा दिलेल्या आहेत व पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Tags
पनवेल