पनवेल दि.१५(संजय कदम): तालुक्यातील खेडुकपाडा येथील एक इसम कोणाला काही एक न सांगता घरातून कोठेतरी निघून गेल्याने तो हरवल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
शाहबाज मुबारी हुसेन अन्सारी( वय ४०) असे या इसमाचे नाव असून तो अंगाने मजबुत, रंग सावळा, उंची अंदाजे ४.८ फुट, चेहरा गोल, नाक सरळ, डोक्याचे केस काळे, दाढी काळी पुर्ण वाढलेली, अंगात नेसुस पांढऱ्या रंगाचा पठाणी ड्रेस, डोक्यावर पांढऱ्या रंगाची गोल टोपी, पायात चप्पल असून त्याला हिंदी भाषा बोलता येते. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी कळंबोली पोलीस ठाणे किंवा पोहवा बाबासाहेब शिरसाठ यांच्याशी ८३६९०४४६७९ यांच्याशी संपर्क साधावा
Tags
पनवेल