कामोठे येथील साई नगर सोसायटीच्या टेरेसवरील पत्रे व बाहेरील आवारात ब्लॉक बसवून देण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे मागणी


कामोठे येथील साई नगर सोसायटीच्या टेरेसवरील पत्रे व बाहेरील आवारात ब्लॉक बसवून देण्याची शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे मागणी*
पनवेल दि.१५(संजय कदम): कामोठे येथील साई नगर सोसायटीच्या टेरेसवरील पत्रे व बाहेरील आवारात ब्लॉक बसवून देण्याची मागणी सोसायटीच्या वतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्याकडे कामोठे उप शहर प्रमुख सचिन मनोहर त्रिमुखे यांनी केली आहे.


  शिवसेना शहरप्रमुख राकेश गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली साई सागर सोसायटी प्लॉट नं.03 सेक्टर 35 प्रभाग क्रमांक 13 या सोसायटीच्या वतीने आमदार किंवा खासदार निधीतून आमच्या सोसायटीच्या टेरर्स वरील पत्रे आणि बाहेरील आवारात ब्लॉक बनवून द्यावेत. तसेच ह्या विषयावर लवकरात लवकर विचार करून सहकार्य आणि निधी उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी पदाधिकाऱ्यांना दिली आहे.


थोडे नवीन जरा जुने