सखी मंगळागौर ग्रुप पनवेलने पटकावला तृतीय क्रमांक*
ह्या वर्षी न्यूज 18 लोकमत, लोकशाही, जय महाराष्ट्र ह्या टीव्ही चॅनल्स मधील प्रोग्राम मध्ये सखी ग्रुप चा सहभाग होता तेथेही त्यांना तृतीय बक्षीस मिळाले. तसेच या ग्रुपने विविध स्पर्धेत बक्षिसे मिळाली आहेत यामध्ये प्रामुख्याने यंग स्टार ट्रस्ट विरार ह्यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील भव्य दिव्य पारंपारिक मंगळागौर स्पर्धा 2023 ह्यामध्ये 75 संघ सहभागी होते त्यामध्ये ग्रुप चा तृतीय क्रमांक आला. दरम्यान राष्ट्रवादी संगे मंगळागौर ह्या राज्य स्तरीय मंगळागौर स्पर्धेत महाराष्ट्रातील तब्बल 100 संघातून 10 संघांची निवड झाली आणि फायनल सादरीकरणातून सखी ग्रुप चा तृतीय क्रमांक आला असून त्यांना एक लाख रुपये, भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले
पनवेल दि.१५(संजय कदम): राष्ट्रवादी संगे मंगळागौर राज्यस्तरीय स्पर्धा रविंद्र नाट्य मंदीर प्रभादेवी येथे संपन्न झाली. यामध्ये सखी ग्रुप पनवेल यांचा तृतीय क्रमांक आला असून त्यांना 1लाख रोख आणि प्रमाणपत्र भेटवस्तु हे बक्षिस राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याहस्ते देण्यात आला.
सखी मंगळागौर ग्रुप ची सुरुवात 2016साली झाली. मंगळागौर, डोहाळेजेवण, आणि बारस असे कार्यक्रम ग्रुपतर्फे करण्यात येतात. या ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे पारंपारिक वेषात, पारंपारिक गाण्यांवर पारंपारिक खेळ जास्तीत जास्त दाखविले जातात. आता पर्यंत विविध टीव्ही चॅनल्स वर ग्रुपचे विविध सेलिब्रीटी बरोबर कार्यक्रम झाले आहेत.
ह्या वर्षी न्यूज 18 लोकमत, लोकशाही, जय महाराष्ट्र ह्या टीव्ही चॅनल्स मधील प्रोग्राम मध्ये सखी ग्रुप चा सहभाग होता तेथेही त्यांना तृतीय बक्षीस मिळाले. तसेच या ग्रुपने विविध स्पर्धेत बक्षिसे मिळाली आहेत यामध्ये प्रामुख्याने यंग स्टार ट्रस्ट विरार ह्यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्रातील भव्य दिव्य पारंपारिक मंगळागौर स्पर्धा 2023 ह्यामध्ये 75 संघ सहभागी होते त्यामध्ये ग्रुप चा तृतीय क्रमांक आला. दरम्यान राष्ट्रवादी संगे मंगळागौर ह्या राज्य स्तरीय मंगळागौर स्पर्धेत महाराष्ट्रातील तब्बल 100 संघातून 10 संघांची निवड झाली आणि फायनल सादरीकरणातून सखी ग्रुप चा तृतीय क्रमांक आला असून त्यांना एक लाख रुपये, भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले
. ह्या वर्षातील अजून एक उल्लेखनीय आणि आनंदाची गोष्ट म्हणजे सखी मंगळागौर ग्रुप आणि जे एम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा आणि पनवेल महानगर पालिका क्षेत्र मर्यादित पारंपारिक मंगळागौर स्पर्धा 20 ऑगस्ट रोजी भरवण्यात आली ज्या मध्ये विविध बक्षीसांची लयलूट करण्यात आली
. याबद्दल सखी मंगळागौर ग्रुप पनवेल प्रमुख स्नेहा प्रमोद काणे आणि डॉ. प्रज्ञा भुसारे यांनी हा ग्रुप स्थापन केल्याचा अभिमान असल्याचे मत व्यक्त केले आहे. या संदर्भात कोणाला कार्यक्रम आयोजित करायचा असल्यास त्यांनी सखी मंगळागौर ग्रुप पनवेल प्रमुख
स्नेहा प्रमोद काणे यांच्याशी मोबाईल नंबर 9594972998 येथे संपर्क साधावा.
Tags
पनवेल