गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खोपटे ते कोप्रोली व दिघोडे ते दास्तान मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याची मनसे व काँग्रेस पक्षाची मागणी.







गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खोपटे ते कोप्रोली व दिघोडे ते दास्तान मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याची मनसे व काँग्रेस पक्षाची मागणी.


मनसे व काँग्रेस तर्फे वाहतूक विभागातील पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांना देण्यात आले निवेदन.



उरण दि 14(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील खोपटे कोप्रोली रोड वर सातत्याने मोठ्या प्रमाणावर जड अवजड वाहनांची ये जा होत असते. सदर रोड वर असणाऱ्या सी. एफ. एस. व एम टी यार्ड मध्ये मोठ्या प्रमाणावर जड अवजड वाहने ये जा करत असतात. त्यामुळे रोजच वाहतूक कोंडी होत असून त्याचा त्रास सामान्य जनतेला सहन करावा लागतो. खोपटे कोप्रोली 2 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी कधी कधी दोन तास वाया जातात. त्यामुळे या समस्यावर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे.येत्या 19 तारखेपासून गणपती उत्सव सुरु होत आहे




. सदर उत्सवाच्या काळामध्ये सामान्य जनतेला रोजच्या वाहतूक कोंडीच्या समस्ये पासून वाचवण्यासाठी येणाऱ्या 15 तारखेपासून पुढील महिन्याच्या 15 तारखेपर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेमध्ये अवजड वाहनांना सदर रस्त्यावर ये जा करण्यास बंदी घालून वरील समस्याचे निराकरण अशी मागणी यावेळी काँग्रेस पक्ष व मनसे पक्षाच्या वतीने वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांना करण्यात आले. या मागणीचे निवेदन सुद्धा पोलीस उपनिरीक्षक संजय पवार यांना देण्यात आले.यावेळी संदेश ठाकूर रायगड जिल्हाध्यक्ष मनसे,सत्यवान भगत तालुका अध्यक्ष मनसे,विनोद म्हात्रे तालुका अध्यक्ष काँग्रेस,अल्पेश कडू तालुका चिटणीस तथा वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष,मंगेश वाजेकर उपतालुका अध्यक्ष मनसे,राकेश भोईर उपतालुका अध्यक्ष मनसे,बबन ठाकूर विभाग अध्यक्ष मनसे,श्रीरंग म्हात्रे उपविभाग अध्यक्ष मनसे आदी मान्यवर उपस्थित होते.






थोडे नवीन जरा जुने