तानाजी घ्यार यांना मुंबई विद्यापीठाचा पुरस्कार


तानाजी घ्यार यांना मुंबई विद्यापीठाचा पुरस्कार


उरण दि 13(विठ्ठल ममताबादे )
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक तानाजी घ्यार यांना मुंबई विद्यापीठातर्फे उत्कृष्ट प्रशासकीय कर्मचारी हा पुरस्कार देण्यात आला. विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा.डॉ. सुहास पेडणेकर, वर्तमान कुलगुरू प्रा.डॉ.रवींद्र कुलकर्णी व प्र. कुलगुरू डॉ.अजय भांबरे, इतर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानपूर्वक पुरस्कार दिला गेला. तानाजी घ्यार हे कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक व्यक्ति असुन विद्यार्थी व महाविद्यालय तसेच विद्यापीठातील सर्वांनाच सहकार्य करणारे मनमिळाऊ कर्मचारी आहेत. याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. बळीराम एन. गायकवाड, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपचंद्र शृंगारपुरे, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, ज्येष्ठ प्रा. के. ए. शामा, प्रा.व्हि.एस. इंदुलकर, डॉ.पराग कारुलकर, आय,क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. ए.आर.चव्हाण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


थोडे नवीन जरा जुने