विरार अलीबाग काॅरीडोर संबंधी 500 च्या आसपास शेतकर्‍यांच्या हरकती.

विरार अलीबाग काॅरीडोर संबंधी 500 च्या आसपास शेतकर्‍यांच्या हरकती.
शेतकर्‍यांना अल्प मोबदल्यात,सुवीधांपासून वंचित ठेवून गुंडाळण्याचा शासनाचा प्रयत्न.
एकिकडे शेतकऱ्यांच्या अधिकारांबाबत आयोजित पहिल्या जागतिक परिषदेचे राष्ट्रपतींच्या हस्ते उदघाटन ,तर उरण मध्ये शेतकर्‍यांच्या अधीकारांची पायमल्लीउरण दि 13(विठ्ठल ममताबादे )विरार अलिबाग काॅरीडोर संबधीत आलेल्या नोटीसींना दि.12 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत उरण तालुक्यातील 500 च्या आसपास शेतकर्‍यांनी आपल्या हरकती भूसंपादन अधीकारी उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या पनवेल येथील भूसंपादन कार्यालयात दाखल केल्या . या हरकती विरार अलिबाग काॅरीडोर बाधीत शेतकरी संघर्ष समिती च्या पदाधीकार्‍यांनी नायब तहसीलदार राजाराम कडू यांच्या उपस्थितीत कार्यालयात सादर केल्या.यावेळी समितीचे अध्यक्ष संतोष ठाकूर ,उपाध्यक्ष राजाराम जोशी, उपाध्यक्ष रमण कासकर,उपाध्यक्ष नामदेव मढवी,चिरनेर अध्यक्ष सुभाष कडू, सदस्य सिकंदर जोशी,संदेश पाटील, पृथ्विराज ठाकूर,आदी उपस्थित होते.
अलिबाग विरार काॅरिडोर साठी भूसंपादनाबाबत शेतकर्‍यांना जमिनीचा भाव व ईतर सुवीधांचे स्पष्टिकरण न देताच शासनाने शेतकर्‍यांना नोटीसी पाठवील्या आहेत.बर्‍याच नोटीसी ह्या शेतकर्‍यांना वेळेवर मिळाल्या नव्हत्या .त्यामूळे मागील मिटींग मध्ये त्या सादर करण्याबाबत शेतकरी संघर्ष समितीने मुदत वाढ मागीतली होती.त्यांच्या विनंतीनुसार दत्तात्रेय नवले यांनी मुदतवाढ दिली होती.त्यानुसार जवळपास 500 च्या घरात शेतकर्‍यांनी हरकती नोंदवील्या आहेत.
 उरण मध्ये केंद्र शासन आणि राज्य शासनाचे अनेक प्रकल्प आल्याने येथील जमिनींना सोन्याचा भाव आला आहे.येथे प्रचंड किमती जमीनींना असताना ,शासन मात्र या जमिनी कवडी मोल भावाने विकत घेवू पाहत आहे. हा एक प्रकारे शेतकर्‍यांच्या जमिनींवर डाका टाकण्याचाच प्रकार आहे. जमिनी अधीग्रहणाबाबत 2013 चा आधुनीक कायदा असताना शासन मुद्दामुन जूना कायदा वापरून आपल्याच शेतकर्‍यांना फसवू पहात आहे. 
.
थोडे नवीन जरा जुने