महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाची कोकण विभागातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.
उरण दि 13(विठ्ठल ममताबादे )
आगामी होऊ घातलेल्या पदवीधर मतदार संघाच्या मतदार नोंदणी संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाची कोकण विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष/शहर अध्यक्ष यांची बैठक कोकण विभागीय अध्यक्ष शंभो म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रसिध्दी प्रमुख शैलेश राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल येथील आगरी शिक्षण संस्थेच्या कार्यालयात पार पडली.यावेळी पनवेल तालुका कार्याध्यक्ष श्रृतीताई म्हात्रे,प्रदेश सरचिटणीस भोलाशेठ पाटील,प्रदेश सचिव बाळाशेठ वासकर, सिंधुदूर्ग जिल्हाध्यक्ष महेश अंधारी,रायगढचे जिल्हाध्यक्ष उमेश भोईर,ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष तुषार देसले,भिवंडी जिल्हाध्यक्ष अनंता पाटील,नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संतोषजी सुतार,अर्जुन माळी,धनाजी गोंधळी,मुंजावर सर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी ओबीसी आरक्षण विषयक काँग्रेसची भूमिका,आगामी होऊ घातलेल्या पदवीधर मतदार संघाचे मतदार नोंदणी संदर्भात चर्चा करण्यात आली.
Tags
उरण