गोशीन रियु विद्यार्थ्यांचे सुयश.

गोशीन रियु विद्यार्थ्यांचे सुयश.
उरण दि 13(विठ्ठल ममताबादे ) रायगड जिल्ह्यातील पेण येथे आयोजित जिल्हास्तरीय शालेय जुडो स्पर्धा घेण्यात आल्या.त्या स्पर्धेमध्ये विविध वजनी गटात विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.त्या स्पर्धेमध्ये गोशीन रियूच्या विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले. श्रेया म्हात्रे, आयुष गावंड, आर्या गावंड, यश पाटील साक्षी पंडित, कार्तिकी म्हात्रे, रेहान्त भोईर या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविले. विजयी उमेदवारांची मुंबई विभाग स्तरीय जुडो स्पर्धेमध्ये निवड झाली आहे व नेहा पाटील, विघ्नेश पाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळवला.ओम पाटील, जीत तांडेल तनवीर इसाक अली या विद्यार्थ्यांनीहि चांगली कामगिरी केली.सिंह राजू कोळी, गोपाल म्हात्रे,राकेश म्हात्रे,अमिषा घरत यांनी या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


थोडे नवीन जरा जुने