१५ सप्टेंबरपासून क्रोमामध्ये आयफोन १५ सिरीज खरेदी करण्याचा पहिला मान मिळवा
पनवेल, नवी मुंबई (प्रतिनिधी) क्रोमा स्टोअर्समध्ये आयफोन १५ खरेदी करण्यासाठी केवळ दोन हजार रुपयात प्री बुकिंग करता येणार असून २४ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय आणि इतर अनेक ऑफर्स आणि डिस्काउंट मिळणार आहेत. पूर्ण पेमेंट करणाऱ्याला डिस्काउंट मिळणार आहे. अँपलच्या लेटेस्ट आयफोन १५ सिरीजचे भारतात आगमन झाले असून मोबाईल फोन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. १५ सप्टेंबरपासून क्रोमा स्टोअर्समध्ये आणि croma.com या वेबसाइटवर आयफोन १५ साठी प्री बुकिंग करता येणार आहे. आयफोन १५ सिरीज, अँपल वॉच सिरीज ९ आणि अँपल वॉच अल्ट्रा २ ही गॅजेट्स २२ सप्टेंबर पासून क्रोमामध्ये उपलब्ध असतील.            क्रोमा स्टोअर आणि croma.com वर पहिल्या चार दिवसांमध्ये आयफोन १५ ची बुकिंग करणाऱ्यांना कॉर्डेलिया क्रुझवर होणाऱ्या क्रोमा क्रूज कंट्रोल या सोहळ्यासाठी तिकीट जिंकण्याची संधी मिळणार आहे. मुंबई, पुणे, सुरत येथील ग्राहकांना ही संधी असेल. त्यासाठी त्यांना १५ ते १८ सप्टेंबर या काळात प्री बुकिंग करावी लागेल. २१ सप्टेंबर पर्यंत सर्व स्टोअर्स आणि वेबसाईटवर प्री-बुकिंग सुरू राहील. याशिवाय प्री-बुकिंग करणाऱ्यांना क्रोमाद्वारे ठराविक शहरांमध्ये एक्सप्रेस डिलिव्हरीचाही लाभ मिळेल. ही सेवा इतर इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर्सकडे मिळत नाही. ग्राहक एक्सप्रेस डिलिव्हरी पर्यायाची निवड करून आयफोन १५ सिरीज अँपल वॉच सिरीज९ आणि अँपल वॉच अल्ट्रा २ यांची प्री बुकिंग करू शकतात. त्यामुळे त्यांच्या हातात थेट त्यांचे गॅजेट मिळू शकेल.


 ही सेवा ठराविक शहरांमध्ये असेल. ग्राहकांना 22 सप्टेंबर रोजी त्यांच्या हातात प्री बुकिंग केलेले उत्पादन मिळेल. आयफोन १५ सिरीज एक अनोख्या डिझाईनमध्ये आणि कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. आयफोन १५ आणि आयफोन १५ प्लस यासाठी ब्लॅक, ग्रीन, पिंक, येल्लो आणि ब्लू या रंगाचे पर्याय तुम्ही निवडू शकता. आयफोन १५ प्रो आणि प्रो-मॅक्स यासाठी टायटॅनियम फिनिशमधील नॅचरल टायटॅनियम, ब्लू टायटॅनियम, ब्लॅक टायटॅनियम रंग उपलब्ध आहेत. क्रोमाकडे हे सर्व पर्याय फ्री-बुकिंगसाठी उपलब्ध असतील. २४ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयची सुविधा, क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या खरेदीवर ऑफर्स, ०६ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बेनिफिट, ०५ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक अशा विविध ऑफर्स असणार आहेत. 


थोडे नवीन जरा जुने