पनवेल महापालिकेचे मा. नगरसेवक राजू सोनी यांना कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; राजू सोनी यांचे कार्य कौतुकास्पद- आमदार रमेश पाटील




पनवेल दि.२६(संजय कदम) : पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक राजं सोनी यांना कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच राजू सोनी यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले.
     यावेळी राजू सोनी म्हणाले की, सामाजिक कार्य करताना लोकांची सेवा करण्यात वेळ घालवता येतो. आपल्याला मिळालेले आयुष्य हे क्षणिक असून या आयुष्यात दिनदुबळ्यांची, अडल्यानडलेल्याला मदत करावी. संत महात्म्यांनी सांगितल्याप्रमाणे जनसेवा हीच ईश्वरसेवा मानून माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी जनसेवा करणार असल्याची ग्वाही पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक राजू सोनी यांनी दिली. 


तसेच आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी प्रामुख्याने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांचे विशेष आभार मानतो असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी, पत्रकार संजय कदम, मल्हार टीव्हीचे संपादक नितीन कोळी, पत्रकार प्रवीण मोहकर, सतपाल सिंग, सोमनाथ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटील उपस्थित होते. 
फोटो: राजू सोनी वाढदिवस


थोडे नवीन जरा जुने