करंजाडेमध्ये स्कूल बस खड्ड्यात अडकली






करंजाडेमध्ये स्कूल बस खड्ड्यात अडकली

मा. सरपंच रामेश्वर आंग्रे यांचे सहकारी धावले मदतीसाठी

पनवेल -- करंजाडेमध्ये खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पावसामुळे कुठे किती मोठा खड्डा आहे हे वाहन चालकांना समजून येत नाही. अनेक वाहने खड्डे चुकविण्याच्या नादात पडले आहेत. मात्र शनिवारी स्कूलबस चालकाला खड्ड्याचा अंदाज न आल्याने बस खड्ड्यात अडकली. मात्र विध्यार्थीना सुखरूप बाहेर काढले. याबाबत पालकांनी बस चालकावर नाराजी व्यक्त केली. 



करंजाडे वसाहतीत पावसाळा आणि खड्डे हे समीकरण बनले आहे. मात्र या खड्ड्यामुळे अनेक वाहन चालक खड्ड्यामुळे दुचाकी घसरून रस्त्यावर पडून किरकोळ जखमी झाले आहेत. शनिवारी दुपारी करंजाडे येथील स्कूल बस चालक बसमध्ये विध्यार्थीना घेऊन जात असताना पावासाच्या पाण्यात खड्ड्यात साचलेला असल्याने स्कूल बस चालकाला त्या खड्ड्याचा अंदाज न आल्याने ती स्कूल बस विध्यार्थीसह खड्ड्यात अडकली. यावेळी काही जागरूक नागरिकांनी तात्काळ माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानुसार आंग्रे हे मराठा समाज मोर्चा पनवेल येथे असताना देखील त्यांनी त्यांचे सहकारी यांना तात्काळ मदतीला जाण्याचे सांगताच सहकाऱ्यांनी त्यावेळीला हवी ती मदत केली. आणि वेळीच दुर्घटना टळली. यावेळी पालकांनी मा.सरपंच रामेश्वर आंग्रे यांना धन्यवाद दिले.



पालकांनी केली स्कूलबस चालकावर नाराजी

करंजाडे वसाहतीतील स्कूल बस चालक वाहन जोरात चालवीत असल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर मांडल्या. तसेच स्कूल बस चालक संघटनेवर पालकांनी नाराजी व्यक्त करीत. बस चालकांनी आमच्या मुलांना सुखरूप घेऊन जाणे व सोडणे असे पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

रामेश्वर आंग्रे यांनी दिली बसचालकांना सूचना

करंजाडे वसाहतीतुन अनेक विध्यार्थी हे पनवेल परिसरात शिक्षणासाठी स्कूल बस ने जात आहेत. मात्र हे बसचालक बस ही सुसाट वेगाने चालवीत असल्याच्या तक्रारी मांडल्या. यावेळी स्कूलबस चालक व अध्यक्ष यांना स्कूल बस च्या आरटीओने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या सूचना यावेळी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी दिल्या.


थोडे नवीन जरा जुने