कोलकर बहिण- भावाचा साता समुद्र पार शैक्षणिक झेंडा







कोलकर बहिण- भावाचा साता समुद्र पार शैक्षणिक झेंडा

वैष्णवी व ऋत्विक दोघांनीही देशाचे मान उंचावली

उद्योजक राजेंद्र कोलकर यांच्या पालकत्वाचा गौरव

पनवेल दि. ०३ ( संजय कदम ) : नवीन पनवेल येथील यशस्वी उद्योजक राजेंद्र कोलकर यांची मुलगी वैष्णवी आणि मुलगा ऋत्विक या दोघांनीही बिझनेस स्कूल मधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. या बहिण भावाने चांगले गुण मिळवून आपली छाप पाडली आहेच. त्याचबरोबर अनुक्रमे कोलाज ची ब्रँड अँबेसिडर आणि आंतरराष्ट्रीय आवडता विद्यार्थी म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. त्याचबरोबर दोघांनीही थेट अमेरिकेत आपल्या बुद्धिमत्तेचा डंका वाजवत भारत देश ,राज्य व पनवेलच्या नावलौकिकात खऱ्या अर्थाने भर टाकली आहे. यामुळे कोलकर दांपत्याच्या पालकत्वाचा साता समुद्रपार गौरव करण्यात आला आहे.



वैष्णवी हिने अलीकडेच यु एसए मध्ये हल्ट बिझनेस स्कूल बोस्टन मधून पदवी प्राप्त केली आहे. तिने पदवीचे शिक्षण घेत असताना भारताचे नाव उज्वल केले आहे.कोलाजची ब्रँड अँबेसिडर म्हणून तिची निवड झाली. या अतिरिक्त जबाबदाऱ्यांसह आपला शैक्षणिक आलेख वरती घेऊन जात असताना तिला 'जागतिक नागरिक' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर 'ग्रोथ माइंडसेट अवॉर्ड' सुद्धा वैष्णवी कोलकर हिने प्राप्त केला. त्यामुळे भारत देशाची मान आणखीनच उंचावली गेली. पदवीचे शिक्षण घेत असताना पनवेलची ही कन्या नेहमीच कोलाजची टॉपर राहिली. या मासिकमध्ये तिच्या गुणवत्तेचा गौरव करण्यात आला. सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे या दर्जेदार व नामांकित आंतरराष्ट्रीय मासिकाच्या मुखपृष्ठावर वैष्णवी चे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले. वैष्णवीचा भाऊ ऋत्विक राजेंद्र कोलकर यांनी सुद्धा परदेशात पनवेलच्या मातीची चुणूक दाखवली.



या विद्यार्थ्याने हल्ट इंटरनॅशनल बिझनेस स्कूलमधून इंटरनॅशनल बिझनेसमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे त्याला जागतिक नागरिक म्हणून ओळख मिळाली. ऋत्विक याला वर्गातील आंतरराष्ट्रीय आवडता विद्यार्थी म्हणून गौरवण्यात आले. त्याचबरोबर या गुणवंत , ज्ञानवंत आणि यशवंत पनवेलच्या सुपुत्राला दुबई आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, सॅन फ्रान्सिस्को देशांकडून सन्मान प्राप्त झाला.




वडिलांच्या कष्टाचे मुलांकडून चीज!

राजेंद्र कोलकर यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. वडिलांचे छत्र लवकरच हरपल्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन ते इंजिनियर झाले. एसटीडी बूथ चालक ते यशस्वी उद्योजक हा त्यांचा थक्क करणारा प्रवास राहिला आहे. आव्हानाला आव्हान करून सामोरे जात असताना प्रतिकूल स्थितीत अनुकूल करण्याची धमक त्यांनी आयुष्यात दाखवून दिली. आपल्या वडिलांनी केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांच्या ऋत्विक आणि वैष्णवी या मुलांनी साता समुद्र पार जाऊन यश संपादन केले. आणि आपले वडील राजेंद्र कोलकर यांच्या श्रमाचे चीज केले.







थोडे नवीन जरा जुने