पनवेल वाहतूक शाखेच्या सतर्कमुळे चोरीस गेलेली मोटार सायकल मिळाली
पनवेल वाहतूक शाखेच्या सतर्कमुळे चोरीस गेलेली मोटार सायकल मिळाली 
पनवेल दि. ०३. ( संजय कदम ) : पनवेल वाहतूक शाखेच्या सतर्कमुळे चोरीस गेलेली मोटारसायकल मालकाला परत मिळाल्याने त्याने समाधान व्यक्त केले आहे .  
                पनवेल वाहतूक शाखेचे म पो हवा. पाटील व पोहवा राठोड यांनी नवीन पनवेल से.१७ येथून एक बेवारस मोटारसायकल हॉर्ननेट कंपनीची क्र.एम एच 04 जे डी . 6263 ही कारवाई दरम्यान त्यांना मिळून आल्याने त्यांनी तिच्या मालकाचा शोध घेतला असता सदर बाबत रबाळे पो.ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याने तपासी अधिकारी पोलीस हवालदार पाटील यांच्याशी संपर्क साधून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या उपस्थितीत मूळ मालकाच्या ताब्यात सदर गाडी देण्यात आली आहे .  


थोडे नवीन जरा जुने