स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा केला

स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा केला. सर्वप्रथम त्यांनी पेण येथील गांधी हॉलमध्ये बहुजन विकास संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली . हा कार्यक्रम पक्षाचे कार्याध्यक्ष विजय धोत्रे यांनी आयोजित केला होता. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सिद्धार्थ कासारे व प्रमुख अतिथी म्हणून महेश साळुंखे उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माणगाव येथील तळा या ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थिती दर्शवली व तेथील कार्यकर्त्यांना आगामी

 निवडणुकांसंदर्भात मार्गदर्शन केले . त्याचप्रमाणे त्यांनी खोपोली येथे आरपीआयचे ज्येष्ठ नेते काशिनाथ तथा दादासाहेब रूपवते यांची शुभेच्छा भेट घेतली व आगामी आंबेडकरी चळवळीच्या दिशा आणि पुढील काम करण्याची पद्धत याविषयी सखोल चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मुंबई येथे जे जे हॉस्पिटला भेट देऊन पक्षाचे कार्याध्यक्ष बाळाराम जाधव यांच्या मुलाचे तब्येतीची विचारपूस केली. सायंकाळच्या वेळेला वडाळा येथील पक्षाच्या मुख्य कार्यालयात त्यांनी भेट दिली व आगामी एक दिवसीय अधिवेशनाच्या पूर्वतयारी विषयी चर्चा केली. त्यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे नेते अशोक जी वाघमारे उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने