कळंबोली वसाहती मधील घनकचरा नियमित उचलण्यात यावा- मा. नगरसेवक रवींद्र भगत






कळंबोली वसाहती मधील घनकचरा नियमित उचलण्यात यावा- मा. नगरसेवक रवींद्र भगत
पनवेल दि.०५(वार्ताहर): पनवेल महापालिकेकडून कचरा संकलन करण्यात वारंवार खंड पडत आहे. परिणामी, पावसाळ्यात कचरा साठून दुर्गंधी पसरत आहे. कंत्राटदारांवर वचक नसल्यामुळे कचरा संकलन नियमितपणे होत नसल्याचा आरोप होत आहे. माजी नगरसेवक रवींद्र भगत यांनी यासंदर्भात महापालिकेला पत्र लिहून शहरातील कचरा नियमितपणे उचलण्याची मागणी केली आहे.


      घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या कंत्राटदाराच्या कामाचा कालावधी संपत आल्यामुळे नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया महापालिकेत सुरू आहे. महापालिका क्षेत्रातील सर्वच भागात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कचरा साठून राहिला की, दुर्गंधी सुटत आहे. मुख्य रस्त्यावरील कचऱ्याचे डबे ओसंडून अनेकदा वाहत असतात, सोसायट्यांबाहेरही कचरा साठून आहे. कचऱ्याभोवती भटके कुत्रे गोळा होऊन कचरा सर्वत्र पसरतात. त्यामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी निर्माण झाली आहे. नागरिकांना या त्रासाचा सामना करावा लागत आहे. कळंबोलीतील शेकापचे नेते माजी नगरसेवक रवींद्र भगत यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून याबाबतची लेखी तक्रार केली आहे. महापालिकेने कचरा नियोजन सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.


थोडे नवीन जरा जुने