कमळ महिला नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, पनवेलच्या २९ व्य वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्नकमळ महिला नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, पनवेलच्या २९ व्य वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
पनवेल दि.०५(वार्ताहर): रायगड जिल्हयातील महिलांची आदर्श पतसंस्था म्हणून नावाजलेली कमळ महिला नागरी सहकारी पतपेढी मर्यादित, पनवेल ही पतपेढी सभासदांचा सहभाग आणि विश्वास संपादन करून २८ वर्षे पूर्ण करून, २९ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आणि संस्थेच्या या अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या सभासदांसाठी कमळ महिला पतपेढी आणि माधवबाग यांचे संयुक्त विद्यमाने कमळ महिला पतपेढी प्रशिक्षण केंद्र, पनवेल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा जास्तीत जास्त सभासदांना लाभ घेता यावा यासाठी सर्व सभासदांना सदर शिबिरास उपस्थित रहावे असे संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले होते.        माधवबाग चे शैलेश जोशी, डॉ. शिवाली सरमलकर आणि टिम आणि कमळ महिला पतपेढीच्या अध्यक्षा मालती आंग्रे, उपाध्यक्षा विभावरी कुळकर्णी, संचालिका अर्चना कुळकर्णी, मनिषा विसपूते, चित्रा मानकामे, उर्मिला वंजारी, पूर्वा खेडेकर, सुषमा जांभळे तसेच कमळ महिला पतपेढीचे संस्थापक तथा तज्ञ संचालक शशिकांत बांदोडकर हे या ठिकाणी उपस्थित होते. या शिबिरास सभासदांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्याबाबत सभासदांनी समाधान व्यक्त केले.थोडे नवीन जरा जुने