पनवेल दि.०५(संजय कदम): जनतेची सेवा हाच आमचा मनी ध्यास व शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ८०% समाजकारण आणी २०% राजकारण या सुत्रास अनुसरुन कामोठे शिवसेना उपशहर प्रमुख सचिन मनोहर त्रिमुखे यांनी साई सागर सेक्टर -35 या सोसायटीचे प्रलंबित प्रश्न निकाली काढल्याबद्दल त्यांचा सोसायटीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला आहे.
येथील साई सागर सेक्टर -35 या सोसायटीचे पाण्याचे ,चेम्बरचे आणि कचरा संदर्भातील काम आढावा घेउन पनवेल महानगर पालिका आणि सिडकोच्या कर्मचाऱ्यांना भेट घेउन आणि सोसायटी मध्ये बोलवून काम पूर्ण करून दिले म्हणून सोसायटीच्या सेक्रेटरी ,चेरमन आणि सगळे सोसायटी मधील रहिवाश्यानी आज शिवसेना उपशहर प्रमुख सचिन त्रिमुखे यांचा विशेष सत्कार करून आगामी सर्व निवडणुकीत आमची सोसायटी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार अशी ग्वाही सुद्धा दिली.
Tags
पनवेल