अखिल भारतीय सांस्कृतिक राष्ट्रीय नृत्य स्पर्धा; पनवेलच्या नृत्य आराधना कलानिकेतन संस्थेच्या विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरीपनवेल(प्रतिनिधी) मुंबई येथे झालेल्या अखिल नटराजम अंतर सांस्कृतिक संघ, आयोजित दहावी अखिल भारतीय सांस्कृतिक राष्ट्रीय नृत्य स्पर्धा आणि महोत्सव या स्पर्धेत पनवेलच्या नृत्य आराधना कलानिकेतन संस्थेच्या विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी करून सुवर्ण यश संपादन केले आहे
     मुंबईत ११ ते १४ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातून शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत पनवेल येथील नृत्यआराधना कलानिकेतन संस्थेच्या संचालिका व प्रशिक्षक गुरु अँड. दिपिका मनीष सराफ व अमिता सचिन सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी भरतनाट्यम या नृत्य शैलीच्या सीनियर गटामध्ये तसेच ज्युनिअर गटांमध्ये सुद्धा प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यात सीनियर गटात शिवानी पाचरकर, तनया घरत, आरती मोरे, प्रणिता वाघमारे व वैखरी पोटे या स्पर्धकांचा सहभाग होता. तर लहान गटात ओवी नाईक, आदिती सावंत, आर्वी देशमुख, श्रेया कोळपकर, मुग्धा कुलकर्णी, वेदिका भुयार या विद्यार्थिनींचा सहभाग होता.


 या स्पर्धेमध्ये गुरु अँड. दिपिका सराफ यांना त्यांच्या सर्वोत्तम नृत्य कोरिओग्राफीसाठी 'नृत्य अविष्कार' अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. अँड. दिपिका सराफ गेल्या बारा वर्षापासून पनवेल मध्ये विद्यार्थिनींना भरतनाट्यम या नृत्याचे प्रशिक्षण देत आहेत. त्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे शालेय विभागच्या प्रचारक, प्रसारक व प्रशिक्षक म्हणून रायगड जिल्ह्यात कार्यरत आहेत. तसेच त्यांची संस्था 'नृत्यआराधना कलानिकेतन' अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मिरज सोबत संलग्न सुद्धा आहे. तसेच विद्यार्थिनींना रंगमंचाचा अनुभव मिळण्यासाठी या संस्थेतर्फे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मुलींना सहभागी केले जाते तसेच नृत्यवर्षा या कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते. या संस्थेच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थिनी प्रशिक्षित झाले असून राष्ट्रीय स्पर्धेतून मिळालेल्या यशाने संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.थोडे नवीन जरा जुने