पनवेल (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर येथील स्व. सौ. साकरबेन करमशीभाई सोमैय्या प्राथमिक विद्यामंदिर व संस्कार केंद्रात साने गुरुजी मुक्तद्वार वाचनालय आणि अवकाश विज्ञान प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. त्यांचे उद्घाटन आणि बहुउद्देशीय सभागृहावरील दुसर्या मजल्याचे भूमिपूजन ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते, उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मीनाताई जगधने यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. १५) झाले.
या समारंभास रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, जनरल बॉडी सदस्य रावसाहेब म्हस्के, प्रकाश निकम, डॉ. राजीव निकम, सुजित जगधने, बापूसाहेबपटारे, विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर, मुख्याध्यापिका सोनालीताई पैठणे, रयत संकुलातील सर्व प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक आदी उपस्थित होते.
Tags
पनवेल